मर्द मराठा ( Mard Maratha )
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."..!!
मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......

"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य...ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं......, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!, अंगी बळ, अन पाठबळ, ...महादेवाच्या, 'पायचं..........!
"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ...मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता...
मर्द मराठा
Reviewed by Admin
on
09:21
Rating:
