पाऊस पाणी (मराठी कविता)

आवडे तुला पाऊस होतं माहीत मला ठेवून गेलीस पाऊस माझ्या वहीत ओला! बेधुंद पडतो पाऊस वही तुडुंब कधीची तुझी एकेक आठवण फेसाळल्या नदीची वहीत उरली न जागा डोळा पाऊस साठवला पुन्हा कशाला हंगाम पावसाचा तू पाठवला? ठेवू तरी कुठे पाऊस सांग आता तू राणी डोळ्यांचं तळं केलं तरी मावेना पाणी!

Post a Comment

0 Comments