प्रेमात पडावेसे वाटते

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...
कोण ग तो तुझा म्हटल्यावर झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....
रोज निरोप घेताना पुन्हा कधी भेटशील म्हणताना पाणावलेले डोळे आणि कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....
कारण नसताना तासभर फोनवर भांडायचा स्वतः राग करून फोनही ठेवायचं फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला आय लव यु चा म्यासेग बघून पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....
नकळत स्पर्श झाल्यावर तिच्या हृदयाचा चुकणार ठोका आणि थरथरणारे ओठ बघून पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....प्रेमात पडावेसे वाटते....

Post a Comment

0 Comments