प्रत्येक जण प्रेमात पडतो

प्रेमात कधी घडत  तर कधी बिघडत कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

प्रत्येक जण कोणावर  तरी प्रेम करतो पण त्यांना सांगताना  का तो अडतो कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याची वाट बघताना  ती अन तिची वाट  बघताना तो का बरं चिडतो

कितीही भांडलो तरी  पुन्हा एकत्र येण्यासाठी  का बरं धडपडतो कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याने जरा दुसरीकडे बघितले  तर ती अन तिने बघितले तर तो का ओरडतो गर्दीत
तिला कुणाचा धक्का लागू नये  म्हणून का तो तिला जवळ ओढतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो का कुणी आयुष्यभर साथ  देण्याचे वचन देऊन आपला हात सोडतो

का कुणी दाखवलेली  स्वप्नं एका क्षणात मोडतो अन का आपण हस-या
चेह-याने या जगासमोर रडतो कारण प्रेमात कधी घडत  तर कधी बिघडत..
प्रत्येक जण प्रेमात पडतो प्रत्येक जण प्रेमात पडतो Reviewed by Admin on 22:59 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.