एक मुलगी पाहीजे

एक मुलगी पाहीजे...... प्रपोज करायला...

वेल क्वालीफाईड,... . रंग गोरा, चेहरा निखळ, साधी...
सलवार कुडता नेसणारी, कधि काळी जिन्स घालणारी...

एक मुलगी पाहीजे, लांब केस असणारी..
माझ्या आई बाबांचा मान राखणारी........ ­.....

एक मुलगी पाहीजे, माझा शब्द पाळणारी...
साडी नेसुन काळजावर वार करणारी...
अशी कडक आयटम दिसणारी...

एक मुलगी पाहीजे, कपाळावर बारीक टिकली लावणारी...
आणि महत्वाचं म्हणजे ओढणी ओढणारी...

एक मुलगी पाहीजे, घरकामात सुग्रण असणारी...
पण जगाची माहीती ठेवणारी...

एक मुलगी पाहीजे, कचकुन मिठी मारणारी...
माझ्यावर माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम करणारी...

एक मुलगी पाहीजे, आठवड्यातुन एकदा तरी पिक्चर ला
चलं म्हणून हट्ट करणारी...
नाही म्हटलं तर उगाचं अबोला धरणारी....

एक मुलगी पाहीजे, अशी लाखात उठून दिसणारी...
माझ्या पेक्षा वयाने लहान असणारी...
डोँळ्यांमधे सत्य जपणारी...
आणि खळी पडेल अशी हसणारी...

आहे काय अशी मुलगी...
मिळेल काय अशी मुलगी मला... करायचय प्रपोज तिला...


Post a Comment

0 Comments