मी कशी वाटते तुला

मी कशी वाटते तुला ? तिने अचूक खडा मारला
प्रश्न साधा सरळ, पण माझा अभिमन्यु झाला

हे काय वेड्यासारख, मी प्रश्न टाळउन पाहिला
तिच्या मनात एकच, आज बरा हा तावडीत भेटला

चल निघू आपण, बघ दिवस पण मावळला
थाम्बुया ना थोडावेळ, तिने पुन्हा गळ टाकला

सुटका नाही आज म्हणत, तिने हात माझा पकडला
प्रेम म्हणावे की पाश हे, आता तुम्हीच काय ते बोला

काय उपमा देऊ अन, काय सांगू आता हिला
माधुरी-ऐश्वर्या म्हणू की, म्हणू सरळ मधुबाला

फूल म्हणू की फुलामधला, गंध म्हणू निराळआ
स्वप्न म्हणू की वास्तवाचा, भास् तो आगाळआ

थोड चढवून सांगू की, सरळ स्पष्टच सांगू तिला
बाई ग प्रेम-बिम समजल नाही अजुन, थोडा वेळ दे मला

नाहीतर नकोच ही दुनियादारी, उगीच व्हायची शाळआ
आवडल तर ठीक, नाहीतर फसायाचा बेत सगळआ

अरे सांग ना..., पुन्हा तिने तोच राग आळवला
आता काहीतरी बोलायचे ठरवत, मीही शब्द उच्चारला

सांगणार होतो तितक्यात तिचा फोन अचानक वाजला
घरचा नंबर बघताच तिने, रुमालाने घाम टिपला

निघते मी आता म्हणत तिने, हात माझा सैल केला
सुटलो बाबा एकदाच म्हणत, मी दीर्घ उसासा सोडला

प्रश्न होता साधा सरळ, पण मी वेढ्यात अडकलेला
एक दिवसासाठी का होइना, अभिमन्यु तेव्हा सुटलेला

Post a Comment

0 Comments