काही आठवणी विसरता येत नाहीत

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही
नाती नाही तुटत

एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या
पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त
नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या
नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!


--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
काही आठवणी विसरता येत नाहीत काही आठवणी विसरता येत नाहीत Reviewed by Admin on 02:13 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.