मी कध्धीच तुला सोडणार नाही

ती: तु माझ्याशिवाय जगशील का रे? मी निघुन जर गेले तर दुसर्या कुणाचा होशील का रे?

तो: बस झोपताना तुझी आठवण येईल झोपण मी सोडुन देईन चालताना तुझा भास होईल पायांना थारा देईन
सुखात तुझी उणीव भासेल

सुख मी विसरुन जाईन मन तुझ्याकडे धाव घेईल मनाला बांध घालीन हसताना पापण्या ओल्या होतील

अश्रृंना मी आवरुन ठेविन स्वप्नांत तुझा चेहरा दिसेल मी स्वप्न बघण सोडुन देईन तु जाशील तेव्हा रोखणार नाही ग तुला


 पण आंतरीक ओढन तुला खेचुन आणिन तुला शेवटच बघितल की श्वासांना थांबविन ह्दयाच धडधडण कायमच लांबविन…

एवढ ऐकुन ती बिचारी पाघळळी घट्ट मिठीत त्याच्या अलगद सामावली.

''ईतक प्रेम करतोस शोन्या माझ्यावर मी कध्धीच तुला सोडणार नाही
तुला सोडुन जाण्याची भाषा परत कधीच करणार नाही.."

Post a Comment

0 Comments