स्वप्नात कुणाला असंही बघु नये

स्वप्नात कुणाला असंही बघु नये...........

स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक हातात आपल्या काहीच नसावे...

कुणाला इतकाही वेळ देवू नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता आपलीच वाट दिशाहीन व्हावी
 कुणाचे इतकेही ऐकू नये की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नयेकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अश्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देवून जागे करावे..

Post a Comment

0 Comments