मला आवडतं

मला आवडतं, तुला त्रास द्यायला,नेहमी तुझ्या खोड्या काढून,उगाचचं तुला सतवायला....

मला आवडतं, तुझ्याशी भांडायला,तु माझ्याशी भांडत असताना,तुझ्याकडे एकटक पहायला....


मला आवडतं, तुला रडवायला,तु मुसूमुसू रडत असताना,तुझे अश्रू पुसत तुला, अलगद मिठीत घ्यायला....

मला आवडतं, तुझ्या संगतीने चालायला,तुझ्या सोबत चालता-चालता,तुझा हात माझ्या हाती घ्यायला....

मला आवडतं, तुझ्यासाठी झुरायला,तुझ्या नकळतचं तुझ्यावर,मनापासुन निस्वार्थ प्रेम करायला....
मला आवडतं मला आवडतं Reviewed by Admin on 10:39 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.