स्वप्न माझे, मी गेल्यानंतर काय हवे

स्वप्न माझे, मी गेल्यानंतर काय हवे मला हवे ते तुला आज जे हवे हवे….
चिअर्स करूनी रडणारा तो ग्लास हवा घाटावरती घोटामधले प्राण हवे….!!

मेल्यानंतर हिशोब करणे शक्य असे जगताना गणिताचे केवळ भय असे
बघतो मी आले गेले कोण कोण ते मला आता इथे कुणाचे भय नसे….
मेल्यानंतर खोटे खोटे रडले कोण दिसतील मजला मित्रच माझे.. दुसरे कोण ?
हाय गेला रे…. पांड्या आता उडुनी गेला गुत्त्यामधले पैसे आता देइल कोण ?

मेल्यानंतर माझ्या सौ रडतील आता आठवण येइल तिला माझी येता जाता
करेल काय पण सांगेल कुणाला… भांडायाला हक्काचा मी निघुन जाता..!!

मेल्यानंतर कळेल मला जगणे सारे हातामधे येतील माझ्या चंद्र नी तारे
अरे सख्या रे उशीर झाला कळता कळता बदलून गेल्या दिशाही सगळ्या वळले वारे….

Post a Comment

0 Comments