सत्य बनून

मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून..

तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून..

तुझ्या हृदयात रहायचे आहे रक्त बनून नव्हे तर धकधक बनून..

तुझ्या शरीरात रहायचे आहे आत्मा बनून नव्हे तर भावना बनून..

मला तुझ्या आयुष्यात रहायचे आहे प्रियकर बनून नव्हे तर जोडीदार बनून.

Post a Comment

0 Comments