मी तिच्यासारखं वागायचं.





 
एकदा आम्ही ठरवलं

एकदा आम्ही ठरवलं तिनं मी आणि मी ती व्हायचं तिने माझ्यासारखं आणि मी तिच्यासारखं वागायचं मी रुसायचं गाल फ़ुगवुन आणि तिने समजवायचं ती गुदगुल्या करणार मी खुदकन हसायचं हसता हसता पाणि येइल डोळ्यात तिने ओठांनी टिपायचं मी मात्र तेव्हा लाजुन तिलाच घट्ट बिलगायचं मी हात फ़िरवायचा तिच्या लांबसडक केसांतुन गाणं सुद्धा गुणगुणायचं तिने शांत पडुन रहायचं कुशीत शिरेल तीच अचानक मग तिनेच वादळ व्हायचं मी मात्र तेव्हा तिला अर्पण व्हायचं बेभान होवुन मीही देहात तिचं वादळ भिनवायचं वादळ शमल्यावर दमलेल्या तिला मी अलगद थोपटुन झोपवायचं एकदा आम्ही ठरवलं तिनं मी आणि मी ती व्हायचं तिने माझ्यासारखं आणि मी तिच्यासारखं वागायचं..
 

Post a Comment

0 Comments