आज काही सांगायचय

ऐकणार असशील तर, आज काही सांगायचयं.. देणार असशील तर, आज काही मागायचयं, खुप झाले दुरुन इशारे, खुप झाले खोटे बहाणे.. जवळ येऊन आज, काही बोलायचयं.. ऐकणार असशील तर, आज काही सांगायचयं.. प्रेम आहे तुझ्यावर, व्यक्त आज करायचयं.. झुरतोतुझ्यासाठी, दिवस रात्र इतकेचं सांगायचयं.. दाखवून तुझ्यावरचे प्रेम, प्रेम तुझ्याकडून मागायचयं.. ऐकणार असशील तर, आज काही सांगायचयं.. किती दिवस अशी, वेगवेगळी कारणे काढून उगाचचं भेटायचं.. तुझ्यावरील माझं जिवापाड प्रेम, तुझ्यापासुनचं लपवायचयं.. एकाचं संधीत आज, खरं खरं बोलायचयं.. ऐकणार असशील तर, आज काही सांगायचय
आज काही सांगायचय आज काही सांगायचय Reviewed by Admin on 00:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.