तो क्षण.

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.

स्वप्नांचा झुला मनात नेहमीच झुलत असतो,
माझ्या समवेत असताना तो नेहमीच बेभान असतो.

दोघांचे हि श्वास मग स्थिरावलेले असतात,
त्याच्या बाहुपाशात हात माझे जखडलेले असतात.

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.

हळुवार पणे मग मने आमची बोलत असतात,
आयुष्यातल्या त्या सुंदर क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असतात..
तो क्षण. तो क्षण. Reviewed by Admin on 13:34 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.