
तू सोबत असलीस, कि प्रत्येक आठवण गोड असते.
तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही.
तीही माझ्या सारखीच आहे, तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही.
आवडली असेल जर तुला तर तुही थोडी दाद द्यावी,
तुझ्यामुळेच लिहिली गेली आहे म्हटलं चला.. कविमनाला थोडी वांटद्यावी.
शब्द सागरात उडी मारून मी शब्द शोधात आहे,
माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी ह्या चारोळी लिहितो आहे.
रातराणीच्या फुलांनी हि सांज बहरू दे,
तुझ्या आठवणींच्या सुगंधाने माझे मन दरवळू दे.
आज तुझ्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत,
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधात आहेत.
प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि लाजवेल तो सुखाला.....
0 Comments