हो मी पण प्रेम केल होत.

Photo: Good morning friends like this page हो मी पण प्रेम केल होत ती आली पुन्हा आज अचानक हवेच्या झुळकी गत. मनी गारवा एक हवासा हलका पसरवत. रूढ रोकडा होता व्यवहार थोडी ओळख त्यात. कसे काय ते बोलही वरवर झाले न झाल्यागत. कितीतरी पण वर्षानंतर तार थरथरली आत.आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
हो मी पण प्रेम केल होत.......
हो मी पण प्रेम केल होत. हो मी पण प्रेम केल होत. Reviewed by Admin on 04:40 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.