का बर हा जीव झुरतो.

Photo: उगाचच गुंतवुन घेतल मी हळव्या माझ्या मनाला अन उगाचच सजा दिली मी शुष्क कोरड्या पापण्यांना  आता दर दिवेलागणीला डोळ्यांत चांदण्या चमकतात ओलेत्या पापण्यांतुन चिंब आसवे ठिबकतात  तुच स्वप्न दाखवलीस अन तुच ती तोडलीस तुझी माझी सोबत तुच मध्ये तोडलीस  कशा घडतात या भेटी आता मला प्रश्न पडतो सोडुन जाणार्या जीवांसाठीच का बर हा जीव झुरतो? -MJउगाचच गुंतवुन घेतल मी
हळव्या माझ्या मनाला
अन उगाचच सजा दिली मी
शुष्क कोरड्या पापण्यांना

आता दर दिवेलागणीला
डोळ्यांत चांदण्या चमकतात
ओलेत्या पापण्यांतुन
चिंब आसवे ठिबकतात

तुच स्वप्न दाखवलीस
अन तुच ती तोडलीस

तुझी माझी सोबत
तुच मध्ये तोडलीस

कशा घडतात या भेटी
आता मला प्रश्न पडतो
सोडुन जाणार्या जीवांसाठीच
का बर हा जीव झुरतो?

Post a Comment

0 Comments