दु:खांत का कळेना.

Photo: शब्दांस वेदनेचा, आकांत का कळेना अश्रृस भावनेचा, दु:खांत का कळेना  गाळुन आसवे हि, राञ सरुन जाते हासुन जागण्याला, क्षणहि आता मिळेना  प्रारब्ध हेच माझे, या भोग यौवनाचे भोगुन पाहिले मी, आणिक सोसवेना  ती भेट पाखराची, जगण्यास शाप झाली ढळले कितीक आसु, अन पापणी लवेना  स्वप्नांत पाहिला तो, आभास गोड होता यादेत गुंततो मी, क्षणहि आता सरेना॥ -mj
शब्दांस वेदनेचा, आकांत का कळेना
अश्रृस भावनेचा, दु:खांत का कळेना


गाळुन आसवे हि, राञ सरुन जाते
हासुन जागण्याला, क्षणहि आता मिळेना

प्रारब्ध हेच माझे, या भोग यौवनाचे
भोगुन पाहिले मी, आणिक सोसवेना

ती भेट पाखराची, जगण्यास शाप झाली
ढळले कितीक आसु, अन पापणी लवेना

स्वप्नांत पाहिला तो, आभास गोड होता
यादेत गुंततो मी, क्षणहि आता सरेना॥

Post a Comment

0 Comments