कुणीतरी असेल तर


डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. 
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं. 
कौतुक करणार कुणीतरी असेल तर, थकेपर्यत राबायला बर वाटतं, 
नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं. 
जिवाला जिव देणारे वाटसरु असतील तर, मरेपर्यत चालायला बर वाटतं...

Post a Comment

0 Comments