असं फक्त प्रेमच प्रेमच असतं......

असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं असतं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
असं फक्त प्रेम असंत

प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
असं फक्त प्रेम असंत

नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
असं...
असं फक्त प्रेमच प्रेमच असतं......

असं फक्त प्रेमच प्रेमच असतं...... असं फक्त प्रेमच प्रेमच असतं...... Reviewed by Admin on 11:38 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.