कोणीतरी एकच असते


मैत्रिणी तर बर्याच असतात
मात्र कोणीतरी  एकच असते
जी आपणास जवळची वाटते

मेसेज तर सगळ्याच जणी करतात
मात्र कोणीतरी एकच असते 
जिचे मेसेज पुन्हा पुन्हा वाचले जातात

हसतात तर सगळ्याच जणी मनापासून
मात्र कोणीतरी एकच असते
जिचे हास्य थेट हृदयालाही हसवते

दुख्खात सांत्वन तर सगळ्याच जणी करतात
मात्र कोणीतरी एकच असते
जी आपल्यासोबत दोन आश्रू ढाळते, धीर देते

बोलतात तर सगळ्याच जणी मात्र कोणीतरी एकच असते
जिचे बोलणे कानात साठवून ठेवावेसे वाटते

भेटतात तर सगळ्याच जणी मात्र कोणीतरी एकच  असते
जिची भेट मनाला वेड लावते

दोन पावलं सोबत तर सर्वच चालतात मात्र कोणीतरी एकच असते
जिच्या सोबत आयुष्यभर चालावस वाटत

आयुष्यात सर्वजणी थोड्याच राहतात मात्र कोणीतरी एकच शेवटपर्यंत राहते
जी नकळतच आवडते, आणि प्रेम बनून राहते
कोणीतरी एकच असते कोणीतरी एकच असते Reviewed by Admin on 09:41 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.