आयुष्याच्या पुस्तकाची पाने.

आयुष्याच्या पुस्तकाची पाने पलटत असताना
अचानक काही महत्वाची पाने सापडली..
ती पाहताच जुनी आठवण पुन्हा जागी झाली...

काही पाने सैल झाली होती मनाच्या आठवणीत हरवून गेली होती ....
काही थोडी फाटलेली हि होती नको असतानाही लिहिली गेलेली होती....

काही थोडी डागाळलेली सुद्धा होती मनावर खोलवर घाव घालून गेलेली होती....
काही आजूनही घट्ट होती पुन्हा पुन्हा लिहावीत असा आव आणत होती ....

काही पाने कोरी करकरीत होती  कदाचित लिहायचीच  राहून गेली होती...
काही सुंदर आणि सुरेख हि निघाली होती जी चेहऱ्यावर आनंदाचे रंग देवून गेली होती ...

काही पाने अशीही सापडली होती .. जी दुखाच्या आश्रुत पुसून गेली होती ...
काही पाने चक्क  जळकी हि मिळाली होती ... खरंच ती हृदयाला चटका लावून गेली होती...

आयुष्याच्या पुस्तकाची पाने विविध छटा दाखवून गेली होती .....
आयुष्य काय असत हेच जणू शिकवून  गेली होती  ....
आयुष्याच्या पुस्तकाची पाने. आयुष्याच्या पुस्तकाची पाने. Reviewed by Admin on 08:53 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.