सखे,
तुझी आठवण काढतो मी इतक्या वेळा...
आकाशात चांदण्या आहेत तितक्या वेळा...
सखे,
तुझा दुरावा छळतो मजला इतका...
काटा नकळत रुततो पायात जितका...
सखे,
आपल्या दोघात अंतर असावे इतके...
श्वासानंतर असते श्वासात जितके...
सखे,
नजरेत तुझ्या अशी असावी धार...
काळजावर व्हावे...अगणिक प्रीतीचे वार...
सखे,
प्रेमगीत आपले...असे कुणी मग गावे...
ऐकताच सखीने सख्यास घट्ट बिलगावे...
सखे.
Reviewed by Admin
on
00:08
Rating:
No comments: