भेट आता लवकरच घडेल .

तुला भेटण्याची ओड  आज  सतवत  आहे 
 दूर जरी असलास तरी तू माझाच सोबत आहे
 तुझापर्यत येण्याची वाट मी हि शोधत आहे
 रस्ता दूर जरी मी तुझापर्यत पोहचणारच आहे

तू हरवलास मला पण मी तुला जिंकणारच आहे
तू गेलास न परतण्याच्या वाटे वरुनी सोडून मला 
मी येऊन तुझ्या  जगात परत तुला मिळविणारच आहे

तू तोडून गेलास प्रेमाच्या  प्रत्येक वचना  जरी   
निभावील मी ती  जीवनाच्या अंत्य श्वासापरी
तो शेवटचा श्वास पण तुझाच नावाचा असेल
तुझी माझी भेट आता लवकरच घडेल!!!!

तुझी माझी भेट आता लवकरच घडेल !!!!

Post a Comment

0 Comments