तिच्या हातातल्या रेषा शोधतो.

तिची आठवण
तिची आठवण आली की  मी समुद्राकडे बघतो अन
पायाला भिजवणार्या प्रत्येक लाटेत ...  तिच अस्तित्व शोधतो !

तिचि आठवण आली की मि आकाशाकडे बघतो
अन ती दिसेल म्हणून उगाचच ... तारे तुटण्याची वाट बघत राहतो !

वाफाळत्या चहात सुध्दा तिचाच गंध असतो
त्या गंधात हरवून  चहा मात्र थंड होवून जातो!

प्रत्येक वेळी आरशात मात्र  फक्त तिच मला दिसते ..
अन तिला निरखून पाहण्यात माझे आवरणे नेहमी राहते!

ति समोर यायची अन  श्वास श्वासात आडकायचा
तिच्या गोड हसण्यात .... जिव माझा कासावीस व्हायचा
मग ...
ति घाबरून माझा हात हाती घ्यायची
तिच्या तप्त स्पर्शात  मि सगळे विसरून जायचो !

आता मात्र तिचि आठवण आली की ...
मि फक्त माझ्याच 
हाताकडे बघतो
अन
हातावरल्या रेघामध्ये
"तिच्या हातातल्या रेषा शोधतो !

Post a Comment

0 Comments