सांग कधी कलनार तुला.

सांग कधी कलनार तुला

शब्द माझे होतील मुके जर न पोहोचले तुला
शब्द माझे पडतील थिटे होतील भार पानावरला
सांग कधी कलनार तुला भाव माझ्या शब्दातला

हे नेत्र काही बोलू पाहे शोधित तुझ्या नजरेला
पण अश्रु माझे क्रूर किती ओलावितात या डोळ्याला
मग सांग कसा कलनार तुला भाव माझ्या डोळ्यातला

गीत माझे तुझ्यासाठी प्रीत माझी तुझ्यासाठी
मग का कलेना तुला अर्थ त्या गीतातला
सांग कधी कलनार तुला भाव माझ्या सुरान्तला

विचार तुझा येता मनी हुरहुर लागे जिवाला
तारा बनुनी राहिलास तू माझ्या भाव विश्वातला
सांग कधी मिलनार का मला तारा माझ्या जीवनातला

विचार तुझे दाटुनी येती जरी धरला तू अबोला
तुझ्या मनी माझा विचार जरी असेल संपलेला
सांग कधी कलनार तुला भाव या अंध प्रेमातला

सांग कधी कलनार तुला. सांग कधी कलनार तुला. Reviewed by Admin on 09:36 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.