खास मुलीच्या मनातलं !!

खास मुलीच्या मनातलं..

कितीदाही भेटलो तरीही,

प्रत्येक वेळी तीचं हुरहूर असते..

तुझ्या मिठीत आल्यावर मी,

स्वःतालाही हरवून बसते..

तुझ्या स्पर्शाने अंगावर,

गुलमोहर फुलतो..

आकाशातला चंद्र,

मुखचंद्रावर येतो..

डोळ्याने तू काही सांगताचं,

शब्दही विरून जातात..

स्पर्शाच्या तुझ्या भाषेला,

मग डोळेही फितूर होतात..

दोन ह्रदयांची धडधड,

एकसारखीचं असते..

तू माझा कधी होतोस,

अन् ?????

मी तुझी झालेली असते..

Post a Comment

0 Comments