असा वेळच कितीसा लागतो !!

सागरापेक्षा खरचं मला

क्षितिजच जवळचा वाटतो

मनातलं कागदावर उतरायला

असा वेळच कितीसा लागतो.........I

सर्व काही उलगडल तरी

काहीतरी राहिलेल असतं

मनातून जे मागितलेलं असतं

नेमकं तेच घडत नसतं

आठवणीचा पसारा जेव्हा

अखेरचा श्वास गाठतो

मनातल ओठावर यायला असा

वेळच कितीसा लागतो.............I

स्वप्नातली फुलपाखरं जेव्हा

डोळ्यातील अश्रुंची जागा घेतात

विचारांच्या पंखावर

हळूच स्वार होतात

कहुर्तेच्या क्षणांचा गोडवा

जेव्हा मनात साठतो

मनातल डोळ्यात दिसवायास

असा वेळच कितीसा लागतो.........I

Post a Comment

0 Comments