तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण परत परत येवो हेच निसर्गाकडे मागतो मी.
तुझ्या प्रेमात अखंड बुडून जावू असे कयास बांधतो मी,
पण वेळेचे बंधन आड आल्याने फक्त त्यावेळेची वाट पाहतो मी.
तुझ्या चेहऱ्याकडे बघून सगळे दुख व संकटे विसरतो मी,
कदाचित त्यामुळेच त्या संकटाना समर्थ लढा देण्याची अंगात ताकद बाळगतो मी.
तुझ्या मनाचा ठाव घेणे खूप अवघड आहे हे नक्की जाणतो मी,
पण काय करणार मन हे बावरे परत परत तुझाच विचार करतो मी.
तुझ्या प्रेमाचा अथांग सागर पोहणे शक्य नाही हे जाणतो मी,
पण त्या सागरात नक्की डुबणार नाही हे पक्के मानतो मी.
तुझ्या सहवासातील शक्य त्या आठवणी पुन्हा पुन्हा उलगडून बघतो मी,
काहीच लक्षात आले नाहीतर उगीचच तुझा विचार करून जगतो मी.
तुझ्या विचारांचे मनात काहूर मांडून राहतो मी,
तूच येशील ते दूर करण्यासाठी हे नक्की नक्की जाणतो मी.......
0 Comments