तुला देण्यासाठी आणली फूले !!

प्रेमाची फूल

तुला देण्यासाठी आणली फूले

द्यायचीच राहून गेली

तुझ्या आठवणीं सारखी

वही मध्येच बंद होउन गेली



फुलांचा जीव गुदमरेल

म्हणून वही उघडून बघतो

त्या कारणाने तुझ्या आठवणीत

थोडा का होइना जगुन बघतो



फूले आपला रंग वास

वहीच्या पानाला देऊन जातात

त्यागात पण प्रेम असते

हे सत्य सांगुन जातात



वहीच्या पानात फूले सुकल्यावर

काही खुणा देऊन जातात

तुझ्या आठवणींच्या जखमा

हृदयाला कायमच रहातात
तुला देण्यासाठी आणली फूले !! तुला देण्यासाठी आणली फूले !! Reviewed by Admin on 05:26 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.