तुझ्या पासून दूर होताना !!

तुझ्या पासून दूर होताना

डोळ्यात पाणी आलं

तू दुसर्‍याचा ऐकून

काळजाचं पाणी झालं...



मला माहित आहे कि

तू तुझ्या मनाचा राजा आहेस

पण तुला माहित नाही कि

तू माझ्या डोळ्यातलं पाणी आहेस



विसराव तुला म्हणते

पण होत नाही मन

तू दुसर्‍याचा आहेस म्हंटलं

तर जात नाही क्षण...



खरंच आहे का ते वाक्य

जे ऐकले मी या कानांनी

विश्वास बसत नाही

तू दिलेल्या या धोक्यांनी ...

Post a Comment

0 Comments